श्री. प्रशांत जगन्नाथ अभ्यंकर यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९७३ रोजी झाला. त्यांचे वडील मा .आमदार श्री. जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर व आई सौ. निर्मला जगन्नाथ अभ्यंकर आहेत. प्रशांत अभ्यंकर हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षणतज्ञ, उद्योजक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले व्यक्तिमत्व असून अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव, सुर्जी ही प्रामुख्याने त्यांची कार्यभूमी आहे .
तसेच “कौसल्या श्रृंगारे एज्युकेशन फाऊंडेशन” अंतर्गत नागपूर, अंजनगाव सुर्जी आणि मुंबई स्थित “निर्मल एज्युकेशन सोसायटी” या अग्रगण्य शैक्षणिक संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आणि विश्वस्त म्हणून ते कार्यरत आहेत. या संस्थां अंतर्गत अनेक महाविद्यालये आणि विद्यालये चालवली जातात.
एक सुंदर जग निर्माण करण्याची आपली जबाबदारी आहे. शिक्षण, स्वच्छता आणि सहकार्य यांच्या माध्यमातून आपण समाजातील समस्यांचे निराकरण करू शकतो.
आपल्या कृतींनी आपण एक समृद्ध आणि समतोल जग निर्माण करू शकतो, जिथे प्रत्येकाला समान हक्क आणि समान संधी मिळतील.
श्री प्रशांत अभ्यंकर गेली अनेक वर्षे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. आपल्या शैक्षणिक संस्थामार्फत युवा पिढीच्या शैक्षणिक विकासासाठी आणि मानसिक जडणघडणीसाठी ते आपल्या विविध संस्थाअंतर्गत अनेक शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी प्रतीबद्ध आहेत.
वृक्षारोपण ,ग्रामस्वच्छता नैसर्गिक शेतीविषयक जागरूकता ही अभियान देखील त्यांनी यशस्वीपणे राबविलेले आहेत.
कोरोना काळात श्रीयुत प्रशांत अभ्यंकर यांच्या संस्थांद्वारे अंजनगाव सुर्जी आणि दर्यापूर तालुक्यातील अनेक गावांतील शाळा, पोलीस स्टेशन, आणि शासकीय कार्यालयांना सॅनिटायझर्स आणि फेस मास्कचे वाटप मोठ्या प्रमाणात केल्या गेले. करोंना आजाऱ्यांना औषधी, भोजन, ब्लँकेट वाटप एतयादी अत्यावश्यक सेवा पुरविल्या गेल्या.
अंजणगाव सुर्जी येथील ग्रामीण रुग्णालयाची स्वच्छतादेखील नियमित पणे केली जाते. त्यांच्या संस्थेमार्फत कापुसतळणी गावातही ग्रामिण रुग्णालय आणि आठवडी बाजाराची स्वच्छता देखील प्रभावीपणे राबवली जाते.
लोकसंत गाडगे महाराजांच्या ग्रामस्वच्छता अभियानाचा वारसा बाळगून कौसल्या श्रृंगारे एज्युकेशन फाऊंडेशनच्या माध्यमातून श्री. प्रशांत अभ्यंकर सीमा व ग्राम स्वच्छता कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम अविरतपणे राबवत आलेले आहेत .
खिरगव्हाण गावात ३०० झाडांची लागवड करून त्यांची देखभाल आणि स्वच्छता होत आहे. अनेक गावांतील आठवडी बाजारांची स्वच्छता देखील नियमित पणे केली जाते.
अंजनगाव सुर्जी येथे अंजनगाव सुर्जी-टाकरखेडा रस्त्यावर झाडांची लागवड आणि देखभाल गेली अनेक वर्ष सुरू आहे. विद्यानिकेतन शैक्षणिक संकुलात ५०० झाडांचे वृक्षारोपण झाले असून, त्या परिसरातील झाडांची देखभाल केली जात आहे. खिरगव्हाण परिसरात देखील ३०० झाडांची लागवड करून त्यांची देखभाल केली जात आहे.
नैसर्गिक शेती आणि कंपोस्ट खतांचे महत्व याबद्दल जागरुकता पसरवण्याचे सुद्धा काम त्यांच्या संस्थेमार्फत अव्याहतपणे सुरू आहे.
श्री प्रशांत अभ्यंकर यांचे कुशल नेतृत्व आणि आस्थापनाद्वारे खालील संस्था यशस्वी पणे कार्यरत आहेत.
कौसल्या श्रृंगारे एज्युकेशन फाऊंडेशन, संचालित. अंजनगाव, सुर्जी, जि. अमरावती येथे :
* विद्यानिकेतन डिग्री कॉलेज फार्मसी
* विद्यानिकेतन डिप्लोमा कॉलेज फार्मसी
* विद्यानिकेतन डिग्री कॉलेज – आर्ट्स, कॉमर्स, सायन्स
* विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेज – आर्ट्स, कॉमर्स, सायन्स
* विद्यानिकेतन कॉलेज आय. टि. आय.
* विद्यानिकेतन कॉलेज – नर्सिंग
Copyright 2024 © Prashant Abhyankar